अलिबाग : प्रतिनिधी
केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या भाऊचा धक्का (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) ही बहुप्रतीक्षित रो-रो बोट सेवा रविवार (दि. 15)पासून सुरू होत आहे. मांडवा टर्मिनल्स येथे दुपारी 12 वाजता या सेवेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्यासाठी भाऊचा धक्का व मांडवा येथे टर्मिनल उभारण्यात आले आहेत. मांडवा येथे समुद्रात ब्रेक वॉटर बंधाराही साकारण्यात आला. बोट उपलब्ध न झाल्याने ही जलवाहतूक सेवा दोन वर्षे रखडली होती. बोट आल्यानंतर तिची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाली. त्यानंतर ही सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper