अलिबाग : प्रतिनिधी
चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. 19) रात्री उशिरा महाड येथील चवदार तळ्याला भेट दिली आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ते बुद्धवंदनेतही सहभागी झाले होते.
या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नरनवरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, ‘बार्टी’चे महासंचालक श्री.सुनील वारे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नामदे, समाज कल्याण सहायक आयुक्त सुनील जाधव, महाडचे तहसीलदार सुरेश काशीद, मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूरच्या तहसीलदार दीप्ती देसाई आदी उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठीदेखील पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्याचे सांगितले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी या वेळी दिली.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper