पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री सभा घेणार आहेत. ही सभा येत्या मंगळवारी (दि. 23) दुपारी 3 वाजता कामोठे बौद्धविहारासमोरील मैदानात आयोजित करण्यात आली आहे. या सभेस रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, रिपाइंचे कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड आदी नेते उपस्थित राहाणार आहेत. सभेस महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper