Breaking News

मुरुड ते साळाव रस्त्याच्या कामास प्रारंभ

मुरुड : प्रतिनिधी : मुरुड ते साळाव रस्त्याच्या कामास मंगळवार (दि. 21) पासून सुरुवात झाली आहे. सुमारे 7 कोटी रुपयांच्या या कामाची सुरुवात कोटेश्वरी मंदिरापासून करण्यात आली. सध्या असलेल्या रस्त्यावर कार्पेट टाकण्याचे काम सुरु आहे. कोटेश्वरी मंदिरापासून नवाबाच्या राजवाड्याच्या पुढे सदरचे  काम करण्यात येणार आहे. पावसाळा जवळ आला असून, तत्पुर्वी रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली आहे. या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply