Breaking News

मुरूडचे जनजीवन विस्कळीत

मरूड : प्रतिनिधी – मुरूड शहराचे जनजीवन पूणपणे विस्कळीत झाले आहे. कोरोनो प्रतिबंधासाठी शासन योग्य पाऊल उचलत आहे. पण लोकांना असल्या जीवनाची सवय नसल्याने एक एक दिवस घरात बसून घालवणे कठीण जात आहे. त्यातूनच लोक टुव्हीलर घेऊन बाजारात येतात आणि पोलिसांच्या तावडीत सापडतात. सध्या मुरूड बाजारपेठेत सकाळी पूर्ण लोक डाऊन असतो. 11 वाजता किराणा व मेडिकल उघडतात ते 5 वाजेपर्यंत खरेदी चालते. तशी लोकांनी या पूर्वीच महिनाभराची खरेदी केली आहे त्यामानाने तुरळक लोक बाजारात दिसतात.

मुरूड तालुक्याचा विचार करता गावामध्ये सरपंच आणि गावकरी कोणालाही विनाकारण बाहेर जाऊन देत नाही. पण याने रिज कमावून खाणारा वर्ग फार खचून गेला आहे. काम बंद पगार बंद असे लोक काय करणार असा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील व गावातील काही समाजसेवक व व्यापारी यांच्याकडून आदिवासीवाडीवर गहू तांदूळ, तेल व गरजेचे धान्य वाटप सतत चालू आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply