मुरुड : प्रतिनिधी
पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना येथील अंजुमन इस्लाम जंजिरामहाविद्यालयामध्ये गुरुवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी बालदिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
संस्थेचे खजिनदार अल्ताफ मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते पं. नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पोलीस निरीक्षक आर. पी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
पोलीस उपनिरीक्षक, प्रशांत सुबनावळ, महाविद्यलाय विकास समितीचे सदस्य इस्माईल शेख, अंजुमन हायस्कुलचे प्राचार्य जाहिद गोठेकर उपस्थित होते. बालदिनानिमित्ताने अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कुलमधील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व उर्दू भाषांमध्ये निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ. साजिद शेख आणि डीएलएलइ विभाग प्रमुख प्रा. सोनाली पवार यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना निदा गोरमे, नादिया दामाद, सफा दरोगे, अमिषा पाटील, सोनल पाटील, उझ्मा उलडे, दिशा घोष, तंझिल उलडे, उमर कबले आदी विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper