मुरूड : प्रतिनिधी
प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने गुरुवारपासून बेमुदत एसटी बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यात मुरूड आगारातील 187 कर्मचारी सहभागी झाले असून, त्यांनी आज (दि. 29) दुसर्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवले आहे.
दरम्यान, दोन दिवस एसटी बंद असल्याने प्रवाशांचे व विद्यार्थ्याचे प्रचंड हाल होत आहेत, खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper