Breaking News

मुरूडमध्ये पत्नीची हत्या करणार्या पतीला अटक

पाच दिवसांची पोलीस कोठडी

मुरूड : प्रतिनिधी

क्षुल्लक कारणावरून पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीला मुरूड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सूनावली आहे.

जेवण बनवले नाही म्हणून उमेश रमेश वाघमारे (वय 26, रा. राजपुरी खोकरी, ता. मुरूड) याने 27 फेब्रूवारी रोजी पत्नीची गळा दाबून केली. तेव्हांपासून तो फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन गवारे यांनी एक विशेष पथकसुद्धा तयार केले होते. श्रीवर्धन, भालगाव, तळा, रोहा व आसपासच्या जंगलातसुद्धा आरोपी उमेश वाघमारे याचा शोध घेण्यात आला. अखेर खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीवरून राजपुरी डोंगरावरील जंगलात शोध घेऊन पोलिसांनी आरोपी उमेश वाघमारे याला गुरुवारी बेड्या ठोकल्या.

या प्रकरणी उमेश वाघमारे याच्यावर मुरूड पोलीस ठाण्यात भादवि कलम 302नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश वाघमारे याला शुक्रवारी मुरूड न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply