
मुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, न्यायलयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुरुड शहरात राहणार्या संजिदा मुश्ताक मुकाबी संतोष बेकरी येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांची पर्स त्या बेकरीत विसरून घरी निघून गेल्या. त्यांना याबाबत आठवण झाल्यावर त्या बेकरीत गेल्या असता, तेथे पर्स आढळली नाही. त्यामुळे त्यांनी पर्ससहित मोबाइल गायब झाल्याची तक्रार मुरूड पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संजिदा मुकाबी यांच्या पर्समध्ये 19 हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल होते. पोलीस उपनिरीक्षक स्वरूप जाधव यांनी सायबर सेलची मदत त्याचप्रमाणे बाजारपेठेमधील असणार्या सीसीटीव्ही फुटेज व खबर्याची मदत घेत दोन आरोपींना मुद्देमासह अटक केली. हे आरोपी राजपुरी कोळीवाड्यातील आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचा जामीन मंजूर झाला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper