मुरूड : प्रतिनिधी
भगवान श्री महावीर जयंतीनिमित्त येथील जैन समाजातर्फे मुरूडमध्ये गुरुवारी (दि. 14) भगवान श्री महावीर स्वामी यांचा जन्मकल्याणक उत्साहात साजरा करण्यात आला.
कोरोना नियमामुळे मागील दोन वर्षांपासून कोणतीही मिरवणूक अथवा सण साजरा करता आला नव्हता परंतु यंदा नियम शिथिल होताच मुरूडमधील जैन मंदिरामध्ये गुरुवारी सकाळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रतिमा रथामध्ये ठेऊन ढोलताशांच्या गजरात संपूर्ण शहरात ही मिरवणूक काढण्यात आली.
मुरूड जैन समाजाचे अध्यक्ष हसमुख जैन, ट्रस्टी गौतम जैन, सचिन शहा, छगनलाल जैन, सुरेश जैन यांच्यासह शहरातील जैन बंधू भगिनींनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper