Breaking News

मुरूड तालुक्यात पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरी; हवेत गारवा

मुरूड : प्रतिनिधी

मुरूड शहरासह दोन दिवसापासून ढगाळ वातावरण पसरले आहे. रविवारी तालुक्यातील काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामध्ये नांदगाव या भागात पाऊस झाला आहे. यामुळे हवेमध्ये काही प्रमाणात गारवा जाणवला.

पावसाच्या आगमनाची पाहण्याची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात मान्सून केरळमध्ये धडकेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पहिल्या पावसाच्या सरी कोसळण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे जिवघेण्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना लवकर दिलासा मिळणार आहे.

पावसाची चाहूल लागताच शेतकरी लोकांनी आपल्या शेती मध्ये मशगतीची कामे सुरू केली आहेत. संपूर्ण शेतामध्ये गवताच्या व सुका पालापाचोळा एकत्र करून जाळला जातो. त्यामुळे गवताची तृण जळले जावून पिका व्यतिरिक्त आणखी कोणतीही झाडे झुडपे वाढत नाहीत.

असा हा कार्यक्रम सर्व शेतकरी करीत असतात हवामान खात्याने पावसाचा अंदाज मुबलक पाऊस होणार असल्याचे संकेत दिल्यामुळे शेतकरी सुखावला असून शेतीच्या कामात आता तो व्यस्त झाला आहे.

मुरूड तालुक्यात 3900 हेक्टर हे क्षेत्र भात शेतीचे असून कृषी विभगामर्फत शेतकर्‍यांना बियाणे वाटप सुधा करण्यात आले आहे. तालुक्यात खत सुद्धा उपलब्ध झाले असून शासनाने निर्धारीत केलेल्या दराप्रमाणे खत शेतकर्‍यांना उपलब्ध होत आहे. पावसाची चाहूल लागताच बळी राजा शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply