Breaking News

मुरूड नगर परिषदेकडून मोकाट गुरांवर कारवाई

मुरूड : प्रतिनिधी

नगर परिषदेने भटक्या मोकाट गुरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून दस्तुरी नाका येथे एक मोठा कोंडवाडा तयार केला आहे. त्यामध्ये किमान आठ गुरे राहू शकतात अशी क्षमता आहे.

दिवसाला तीनशे रुपये दंड आकारण्याची प्रक्रिया मुरूड नगर परिषदेने सुरू केली आहे. पकडलेली बैल अथवा गाय सात दिवसाच्या आत न नेल्यास सदरची गुरे गो शाळेत नेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली

आहे.त्यामुळे गुरांचे मालक धास्तावले आहेत.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी रस्त्यावर फिरणार्‍या मोकाट गुरे मालकांवर दांडात्मक कारवाईचे आदेश दिल्याने या धास्तीने गुरे मालकांनी आपापली गुरे घरीच बांधून ठेवण्याचे पसंत केले आहे. कारण आता गुरे रस्त्यावर येताच तातडीने नगर परिषद कर्मचारी या मोकाट गुरांचा ताबा घेतात.

शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी भटक्या मोकाट गुरांच्या कळपामुळे वाहतूक कोंडी होऊन आर्थिक नुकसान व सामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते.

मुरूड शहरातील एकदरा पूल परिसर, गणेश पाखाडी नाका, दस्तुरी नाका, बाजारपेठ, आझाद चौक, मधली आळी, मारुती नाका आदी परिसरात मोकाट गुरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात होते. गुरांच्या वाढत्या उपद्रवाबाबत स्टार फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जाहिद फकजी यांनी मुरूड नगर परिषदेला रीतसर निवेदन दिले होते. त्यांनी गुरांच्या वाढत्या उपद्रवाबाबत तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.

जाहिद फकजी यांनी पुढे सांगितले की, गुरे पकडण्याची मोहीम तीव्र गतीने व लोकांच्या मागणीला प्राधान्य दिल्याबद्दल समस्त शहरवासीयांतर्फे मुरूड नगर परिषद मुख्याधिकारी आणि कर्मचारीवृंदाचे आभार व्यक्त करतो.

आता कुत्र्यांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. भटके कुत्रे निर्दोष व्यक्तीला चावा घेण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. त्यामुळे या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे. मुरूड शहर हे पर्यटन स्थळ असून येथील वाढत्या पर्यटक संख्येस मोकाट गुरांचा त्रास सहन करावा लागत होता. आता नगर परिषदेने कार्यवाही सुरू केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply