Breaking News

मुस्लिम रमजान मासारंभ

घरातच रोजा, इप्तार, तरावीह पठण

उरण : वार्ताहर

कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सरकारने 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्माचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत नियमित नमाज पठण, तरावीह व इप्तारसाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. त्या नुसार उरण शहरा सह तालुक्यातील मुस्लीम समाजातील बांधवांनी मस्जिदमध्ये न जाता आपल्या घरातच सोशल डिस्टन्सिंग पाळून व शासकीय व धार्मिक नियमांचे पालन करून रमजान महिन्याचे घरातच तरावीह पठण अदा केले, असे उरण शहरातील सामाजिक कार्यकर्ते अदिब भाईजी यांनी सांगितले.

Check Also

‘कॅपिटॉल’ची इमारत 98 वर्षांची झाली…

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर उतरून बाहेर पडणार्‍या आजच्या जेन झी पिढीतील काही जण पलिकडच्या फूटपाथवरील …

Leave a Reply