Breaking News

मृतदेह शोधण्यात पनवेलमधील कोळी बांधवांची विशेष मेहनत

पनवेल : रामप्रहर वृत्त

गाढी नदीपात्रात वाहून गेलेल्या आदित्य आंब्रे यांचा मृतदेह शोधून देण्यात पनवेल कोळीवाडा येथील मच्छीमार बांधवांनी विशेष मेहनत घेतली.

आदित्य व सारिका आंब्रे हे दाम्पत्य गाढी नदीपुलावरून वाहून गेले होते. बुधवारी शोधमोहिमेत त्यांची दुचाकी सापडली, मात्र ते बेपत्ता होते. त्यामुळे तिसर्‍या दिवशीही शोधमोहीम सुरू होती. या संदर्भात पनवेल कोळीवाडा येथील हरिचंद्र (हारू) भगत, प्रमोद भगत, कमलाकर कोळी, मनोज कोळी, कृष्णा कोळी यांनी दोन बोटींच्या सहाय्याने प्रयत्न सुरू केले. गुरुवारी (दि. 11) कामोठे जुई येथील खाडीत या मच्छीमारांना आदित्य आंब्रे यांचा मृतदेह दिसला. त्यांनी ताबडतोब ते संबंधित प्रशासन व आंब्रे यांच्या नातेवाईकांना कळविले. त्यानुसार मृतदेह खाडीतून काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply