पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जन शिक्षण संस्था रायगडमार्फत गरीब व गरजू महिलांसाठी मोफत शिवण व ब्युटीपार्लर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना उद्या मंगळवारी (दि. 23) प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.
शक्ती अव्हेनू बिल्डींग, सेक्टर-2 प्लॉट नं. 81 मध्ये दुपारी 3 वाजता होणार्या या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, भाजपा महिला तालुका अध्यक्षा, पंचायत समिती सदस्या रत्नाताई घरत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला प्रशिक्षण घेतलेल्या महिला, महिला मंडळ , महिला कमिटी, कार्यकर्ते आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा महिला तालुकाध्यक्षा रत्नाताई घरत यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper