Breaking News

मोरे महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन

पोलादपूर : प्रतिनिधी

शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या चोळई येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन सोमवारी (दि. 6)उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते महाविद्यालयापर्यंत शिवज्योत आणली. महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य प्रा. सुनील बलखंडे व कार्यालय अधीक्षक मुकुंद पंदेरकर आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयातील साहिल शिगवण आणि अन्य विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयीचे पोवाडे सादर केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील बलखंडे, प्रा. डॉ. राम बरकुले यांनी मनोगत व्यक्त केले.  राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. वसंत डोंगरे यांनी आभार मानले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply