Breaking News

मोरे महिला महाविद्यालयात ‘मिशन युवा स्वास्थ्य’ अंतर्गत लसीकरण अभियान

रोहे : प्रतिनिधी

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयक, तसेच शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीत पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन दि. 25 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.

याच उपक्रमांतर्गत एम. बी. मोरे फाऊंडेशनचे कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय धाटाव रोहा येथील ’राष्ट्रीय सेवा योजना’ विभागातर्फे गुरुवार दि. 28 ऑक्टोबर 2021 रोजी कोव्हिड 19 प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील या शिबिरात 49 लाभार्थ्यांनी लसीकरण करून घेतले.

शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रारंभी आरोग्यसेवक पी. एम. वारे, एस. व्ही. पाटील, व्ही. ए. रुगे, एस. पी. साटमकर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्न म्हसळकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. मयूर पाखर, सहाय्यक प्रा स. प्रतिमा भोईर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply