Breaking News

मोर्बे, दुंदरे, खानावमधील कार्यकर्तेही भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शेकापचे मोर्बे येथील ज्ञानेश्वर पालकर, दुंदरे पाड्यातील नाथा चौधरी आणि खानाव गावातील विलास तळवे गुरुवारी (दि. 26) सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले.

पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शांताराम चौधरी आदी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply