Breaking News

मोहोचापाडा परिसरात विविधविकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन


पनवेल : रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रयत्नातून मोहोचापाडा परिसरात विविध विकासकामे होत आहेत. या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन रविवारी (दि.9) करण्यात आले.
यात मोहोचा पाडा अंतर्गत काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्याचे उद्घाटन (खर्च 10 लाख), मोहोचापाडा अंतर्गत गटार बांधकाम (खर्च 10 लाख), मोहोचापाडा येथील अंगणवाडी ते गणपती घाटपर्यंत काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्याचे उद्घाटन (खर्च 20 लाख), मोहोचापाडा येथील बौद्धवाडीकडे जाणार्‍या काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्याचे उद्घाटन (खर्च 20 लाख), बौद्ध वाडीतील बुद्ध विहार भूमिपूजन (12 लाख निधी मंजुर), मोहोचापाडा अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन (खर्च 10 लाख) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झालेल्या या भूमिपूजन व उद्घाटन झाले. सोहळ्याला भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस यतिन पाटील, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, दशरथ पाटील, सतिश मालुसरे, अनंता पाटील, अरुण जळे, प्रवीण म्हात्रे (मोहो), चिंतामणी शेळके, माजी सरपंच शैलजा भोईर, रघुनाथ भोईर, सुशांत सोनावणे, दीपक सोनावणे, गुरुनाथ भोईर, विष्णू भोईर, अनिल सोनावणे, जगदीश सोनावणे, गणेश भोईर, पांडुरंग भोईर, शंकर भोईर, रघुनाथ शं. भोईर, संजय नागा भोईर, प्रवीण पालव, संतोष पाटील, महेंद्र अण्णा भोईर, माया गोमा भोईर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या विकासकामांमुळे परिसरातील रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था व नागरी सुविधा अधिक सुधारतील. नागरिकांना या उपक्रमांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply