रसायनी : रामप्रहर वृत्त : मोहोपाडा प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत मोहोपाडा येथील शिवशक्ती संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला. मोहोपाडा येथील तरुणांकडून मोहोपाडा प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोहोपाडा ग्रामस्थांसह तरुणांचे संघात प्रत्येकी वीस सदस्य असे चार संघ बनविण्यात आले होते. या सामन्यांचे उद्घाटन माजी जि.प.सदस्य सुरेश म्हात्रे, माजी सरपंच शशिकांत मुकादम, अजित सावंत यांच्या हस्ते करून क्रीडास्पर्धांना सुरुवात करण्यात आली. या स्पर्धांत प्रत्येक संघाने चार संघांबरोबर खेळ करून आपापली कामगिरी दाखवली. यात अंतिम सामना श्रीदत्त मोहोपाडा आणि शिवशक्ती मोहोपाडा यांच्यात झाला. या वेळी शिवशक्ती संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.अंतिम सामन्यात श्रीदत्त संघाने 51 धावा करून शिवशक्ती संघासमोर 52 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या वेळी पाच षटकांतील नऊ चेंडू राखून अंतिम सामन्यात शिवशक्ती संघाने बाजी मारली. शिवशक्ती मोहोपाडा संघाने प्रथम पारितोषिक पटकावून मोहोपाडा प्रीमिअर लीगवर सन 2019 मध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. अंतिम सामन्यात उत्कृष्ट फलंदाज म्हणून जयेश म्हात्रे, तर गोलंदाज म्हणून समीर म्हात्रे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण समीर शेख, मॅन ऑफ दी सीरिजचा मान निशू माळी यांना मिळाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, समाजसेवक अजित सावंत, शशिकांत भंडारकर आदी मान्यवर उपस्थित होते. सामने यशस्विरीत्या पार पाडण्यासाठी शिवनगर मोहोपाडा तरुणाईने अथक परिश्रम घेतले.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper