पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 वाजता मोहोपाडा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मोहोपाडा एचओसी कॉलनीमधील साईबाबा मंदिरात होणार्या या मेळाव्याला राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या वेळी लाभार्थीना मार्गदर्शन आणि त्यांचे अर्ज दाखल करून घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने अर्जदार महिला बहिणींनी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper