Breaking News

यंदा ऑनलाइन ‘दिवाळी पहाट’

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना संक्रमण पाहता यंदा भाजप पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. 14) रोजी ऑनलाईन दिवाळी पहाट 2020 या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळी पहाट उपक्रमाचे या वर्षीचे हे 10 वर्ष आहे.
शनिवारी सकाळी 8.30 ते 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून, फेसबुक व यु ट्यूबवर याचा ऑनलाइन आस्वाद घेता येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध गायक ‘रायगडभूषण’ उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद अझीम खान यांचे वादन, तर समारोप भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी व शिष्यगणांच्या गायनाने होईल. या वेळी तबल्यावर निषाद पवार, हार्मोनियमवर ओमकार दातार आणि पखवाजवर ज्ञानेश्वर खरे यांची साथ असणार आहे, तर सूत्रसंचालन ह.भ.प. जयेश महाराज करणार आहेत. या सुरेल कार्यक्रमाचा जास्तीत जास्त श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक वैभव चौधरी यांनी केले आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply