Breaking News

यांत्रिक शेती करण्यासाठी शेतकर्‍यांना टिलरचे वाटप

मुरूड ः प्रतिनिधी 

शेतकर्‍यांना शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती वृद्धिंगत करता यावी यासाठी किसान क्रांती संघटनेमार्फत शेतकरी समूहाला टिलर वाटप करण्यात आला. मुरूड तालुक्यातील शेतकर्‍यांना यांत्रिक शेतीसाठी रविवारी मजगाव मुरूड विठ्ठल मंदिर सभागृहात पॉवर टिलरचे वाटप करण्यात आले.गटविकास अधिकारी संजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी अहिरे, कृषी विस्तार अधिकारी अरुण धिवरे, किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष टी. एस. देशमुख, उपाध्यक्ष श्रीधर जंजिरकर, तालुकाध्यक्ष प्रशांत मिठागरी, तालुका उपाध्यक्ष लीलाधर गोयजी, सदस्य अतिष आयरकर, गजानन भोईर, अनिल नाकती, अकलाख झोंबारकर आणि 20 शेतकर्‍यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स पाळून टिलर वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply