Breaking News

युईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमध्ये रक्तदान शिबिर

उरण ः रामप्रहर वृत्त

राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)अंतर्गत यु. ई. एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी व नागरी संरक्षण दल, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

युईएसचे अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, सहसचिव चंद्रकांत ठक्कर, खजिनदार विश्वास दर्णे, माजी प्राचार्या व सदस्या स्नेहल प्रधान, माजी अध्यक्ष व सदस्य अ‍ॅड. राजेंद्र भानुशाली, सीनिअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य गिरीश कुडव, स्कूल व कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, सीनिअर कॉलेजचे एचओडी, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक व शिक्षक या वेळी उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटन युईएसचे अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन यांनी स्वत: रक्तदान करून केले. एकूण 27 जणांनी रक्तदान केले.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply