Breaking News

युवा मोर्चाचा खोपोलीत एल्गार; शारजील उस्मानीला पाठीशी घालणार्या राज्य सरकारचा निषेध

खोपोली : प्रतिनिधी

हिंदूंना सडक्या मेंदूचे विधान करणार्‍या शारजील उस्मानी अटक न करणार्‍या तिघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा खोपोलीतर्फे बुधवारी (दि. 17) सकाळी येथील दीपक चौकात निदर्शने करण्यात आली. शारजील उस्मानीच्या विधानाबद्दल गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाने सातत्याने केली होती. युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांच्या पाठपुराव्यानंतर कलम 153अ दाखल करण्यात आले सदर विषय गंभीर असताना, 295 अ व इतर तत्सम गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते, यावरून राज्य शासन उस्मानीला पाठीशी घालीत असल्याचा आरोप करीत भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे खोपोलीतील दीपक चौकात निदर्शने करण्यात आली. युवा मोर्चा खोपोली शाखेचे अध्यक्ष अजय इंगुळकर, सरचिटणीस विनायक माडपे, भाजप शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस ईश्वर शिंपी, अनुसुचित जाती जमाती पदाधिकारी हनुमंत मोरे, दिलीप निंबाळकर, सिद्धेश पाटील, विहिंप नेते रमेश मोगरे, भाजप महिला मोर्चाच्या अनिता प्रधान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित या वेळी होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply