पनवेल : वार्ताहर
भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित युवा वॉरियर्स उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 19) शिवजयंतीच्या पवित्र दिवशी किल्ले सिंहगडावरून आणलेल्या पवित्र ज्योतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. 18 ते 25 वयोगटातील तरुणाईच्या उपस्थितीत जल्लोषात हा शुभारंभ करण्यात आला. या वेळी भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यश विक्रांत पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष सन्मा योगेश टिळेकर, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, पुणे ग्रामीण भाजप जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, उपाध्यक्ष तथा युवा वॉरियर्स राज्य संयोजक अनुप मोरे, पुणे प्रभारी उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, उपाध्यक्ष राहुल महाडिक, सचिव गणेश वरपे, सचिव प्रदीप गावडे, पुणे शहर भाजयुमो अध्यक्ष बापू मानकर, पुणे ग्रामीण भाजयुमो अध्यक्ष किरण दगडे पाटील, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे, प्रदेश सदस्य गणेश कुटे, सचिन जायभाय, अजित कुल्थे, देवयानी भिंगारकर, अक्षय नलावडे, सुशांत गाडे, सर्व मंडळ अध्यक्ष त्यांची टीम, सर्व जिल्हा महामंत्री आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper