पनवेल : वार्ताहर – युवा सबलीकरण, आत्मनिर्भर भारत संकल्प यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे मत भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी संभाजी नगर येथे मराठवाडा विभागातील भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी तसेच विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष महामंत्री बैठकीत केले.
या बैठकीत आगामी काळात संघटन बांधणी, युवा सबलीकरण, आत्मनिर्भर भारत संकल्प या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी अंत्योदयाचे ध्येय उराशी बाळगून मिळालेल्या सेवा संधीचे सोने करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी प्रभारी संजय जी कौडगे, भाजप जिल्हा अध्यक्ष संजय केणेकर, प्रवीण जी घुगे, सरचिटणीस राहुल लोणीकर, उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, कोषाध्यक्ष अभिषेक जैस्वाल आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper