Breaking News

येत्या आठवड्यात सर्वांसाठी लोकल प्रवासाचा मुहूर्त ठरणार?

11-12 डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह आसपासच्या महानगरातील लोक लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत असताना प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण होणार असून, या बैठकीत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते.
येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात 11-12 डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी उपस्थित असणार आहेत. या वेळी कोरोना स्थितीचा आढावा घेऊन लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. ते पाहता 15 डिसेंबरनंतर सर्वांसाठी लोकलप्रवास खुला करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकल सुरू झाल्यानंतर मास्क वापरणे व इतर नियम पाळणे प्रवाशांना बंधनकारक असेल.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply