Breaking News

येत्या 15 मार्चपासून रो रो सेवा होणार सुरू

अलिबाग : प्रतिनिधी

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाऊचा धक्का ते मांडवा रोल ऑन रोल ऑफ (रो रो) जलवाहतूक सेवेची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. येत्या 15 मार्च रोजी या सेवेला प्रारंभ होणार आहे.

भारतमाला प्रकल्पांतर्गत मुंबई महानगराला जोडणार्‍या मार्गावर रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान ही सेवा असणार आहे. यासाठी 125 कोटी खर्चून यासाठी मांडवा येथे सुसज्ज टर्मिनल, जेटी आणि ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात आला आहे, तर मुंबईतील भाऊचा धक्का येथेही टर्मिनल उभारण्यात आले आहे. 

जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रोटोपोरस नामक बोट मागील महिन्यात मुंबईतील अरबी समुद्रात दाखल झाली. त्यानंतर सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण होऊन ही सेवा आता येत्या 15 मार्च रोजी सुरू होत आहे.

एकाच वेळी 50 वाहने आणि 200 प्रवासी घेऊन जाण्याची या बोटीची क्षमता आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टळून वेळेची बचत होणार आहे. यानिमित्ताने कोकणात पर्यटन व्यवसायालाही चालना मिळणार आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply