Breaking News

योगयात्री ग्रंथाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

इन्स्टिट्यूट ऑफ योग अ‍ॅण्ड आयुर्वेद व पनवेल आरोग्य सेवा समितीच्या वतीने योगयात्री या आत्मकथनपर ग्रंथाचा प्रकाश सोहला रविवारी शहरातील चिंतामणी सभागृहात झाला. या सोहळ्यामध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि श्री धूतपापेश्वरचे मॅनेजिंग डायरेक्टर रणजित पुराणिक यांच्या हस्ते योगयात्री या आत्मकथनपर ग्रंथाचे प्रकाशन झाले.

आरोग्य सेवा समितीचे संस्थापक व संचालक कै. पु. ल. भारद्वाज यांच्या योगसाधनेचा प्रवास शंब्दांकित करणार्‍या योगयात्री या अत्नकथनपर ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पनवेल शहरातील चिंतामणी सभागृहात आयोजीत करण्यात आला होता. समाजाच्या निरायम आरोग्यासाठी आपल्या जीवनाचा उत्तरार्ध समर्पित करणारे पु. ल. भारद्वाज यांचे सेवाकार्य अधोरेखित करणारा हा गौरवग्रंथ आहे.

या योगयात्री या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका रुचीता लोंढे, उद्योजक अशोक अत्रे, नेत्रतज्ञ डॉ. नितीन शितूत, योगकेंद्र प्रमुख सूर्यकांत फडके, उपाध्यक्ष सुरेश जाधव, मधुसूदन जोशी, सतीष देशमुख, मानसी वैशंपायन, सुवर्णा पुराणिक, गायत्री अत्रे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply