
पनवेल : वार्ताहर
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपिठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक अंतर्गत मारूती मंदिर नवीन पनवेल केंद्राच्या युवा प्रबोधन विभागाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन पनवेल शहरातील श्री साई ब्लड बँक येथे करण्यात आले होते. त्याला स्वामी सेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशासनाने लावलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून स्वामी सेवकांनी व पनवेलकरांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान शिबीरात सहभाग घेऊन रक्तदान केले. याचा फायदा सध्याच्या स्थितीत उपचार घेत असलेल्या रूग्णांना होणार आहे. या रक्तदान शिबिरात 25 सेवकांनी रक्तदान केले व त्यांना त्याबद्दल प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper