पेण ः प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या देशात रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन श्री कृष्ण जन्माष्टमी व श्री गणेश उत्सव मंडळ चावडी नाका हनुमान आळी यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.श्री गणेश उत्सव मंडळ व वाहन चालक-मालक सामाजिक संघटना कोकण विभाग यांनी एकत्रीतपणे पेण येथील रामेश्वर मंदिर हॉलमध्ये सामाजिक दुरावा राखून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात तरुण सभासदांनी 111 बॅगा रक्त संकलित करून एमजीएम रक्तपेढी, कळंबोली यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री कृष्ण जन्माष्टमी व श्री गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर साने, प्रसन्ना मोडक, दिलीप बापट, प्रसाद आधारकर, डॉ. मंदार जोशी, शैलेंद्र बंगाले तसेच वाहन चालक-मालक संघटनेचे अमोल घोटने, अस्लमभाई शेख यांचे सहकार्य लाभले. एमजीएम रुग्णालयाचे ब्लड बँकेचे प्रमुख राजेश अत्तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले.
RamPrahar – The Panvel Daily Paper