डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम
अलिबाग : प्रतिनिधी
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी (दि. 23) अलिबागमधील कुरूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 250 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.
कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे रायगड जिल्ह्यातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही गरज जाणून रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कुरूळ येथील क्षत्रिय माळी समाज सभागृहात बुधवारी पहिल्या टप्यातील रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
अलिबाग येथील रायगड जिल्हा रक्तपेढीचे डॉ. दीपक गोसावी व त्यांच्या सहकार्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper