मोहोपाडा ः प्रतिनिधी
पत्रकार उत्कर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अभिजित सुरते रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या सहकार्याने पेठगाव कोलखे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास जवळपास 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फू र्त प्रतिसाद दिला.
या वेळी समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, आयोजक अॅड. अभिजित सुरते, माजी सरपंच परशुराम सुरते, मोहन डाकी, माया सुरते, दशरथ सुरते व ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिराला पेठगाव ग्रामस्थ मंडळाचे सहकार्य लाभले. गावदेवी क्रिकेट संघ, आयडियल पार्क कमिटी व सदस्य उपस्थित होते. या वेळी सुरक्षित अंतराचा मंत्र जपत 40 रक्ताच्या बाटल्या रक्तपेढीकडे जमाकरण्यात आल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper