अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबागचा ऐतिहासिक कुलाबा किल्ला पाहायला येणार्या पर्यटकांना आता रणगाडादेखील पाहायला मिळणार आहे. येथील समुद्रकिनार्यावर भव्य रणगाडा बसविण्यात आला असून, यामुळे किनार्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.
प्रसिद्ध पर्यटनस्थळ अलिबागला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचबरोबर समुद्रात कुलाबा किल्ला हे आकर्षण आहे. येथील किनारी मौजमजा करण्यासाठी आणि कुलाबा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. किल्ला वगळता समुद्रकिनार्यावर पाहण्यासारखे काही नाही, परंतु आता टी-55 नामक रणगाडा या किनार्याची शोभा वाढविणार आहे. पुणे खडकी येथील लष्करी कॅम्पमधून हा रणगाडा शुक्रवारी (दि. 20) अलिबाग शहरात दाखल झाला.
रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही कल्पना मांडली आणि सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ती प्रत्यक्षात आली. यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात वापरण्यात आलेल्या या रणगाड्याची लांबी 28 फूट, रूंदी 12 फुट, तर वजन 37 टन आहे. रणगाड्यासाठी अलिबाग समुद्रकिनार्यावर चौथरा बांधण्यात आला आहे. लवकरच या रणगाड्याचे समारंभपूर्वक लोकार्पण करण्यात येणार आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper