
पनवेल ः रायगड शिवसम्राटचे संपादक तथा शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रत्नाकर पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, वादळवाराचे संपादक विजय कडू, पत्रकार सुभाष वाघपंजे, उमेश पाटील, दत्ता भाडुंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper