माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ऐ अल्लाह, कोरोना नामक शैतान को जड से उखाडकर फैंक दे!, अशी दुआ पवित्र रमजान महिन्यात आपापल्या घरांतून केली आहे.रायगड जिल्ह्यातील मुस्लिम बांधव सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करीत कोरोनाचे संकट आल्यापासून शुक्रवारची सार्वजनिक नमाज घरीच अदा करीत आहेत. 24 एप्रिलपासून सुरू झालेल्या पवित्र रमजान महिन्यातील तरावीहची विशेष नमाजही मुस्लिम बांधव घरीच अदा करीत आहेत. प्रार्थनास्थळी जिल्ह्यातील सर्व मशिदींत मौलानांसह जेमतेम पाच जण नमाज अदा करतात.
RamPrahar – The Panvel Daily Paper