मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनीतील सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने परिसरातील शिवनगरवाडी येथील रायगड जिल्हा परिषद (राजिप) शाळेला दोन सिलिंग फॅन, लाडिवली रायगड जिल्हा परिषद शाळेला दोन टेबल फॅन व एक सिलिंग फॅन
आदी वाटप करण्यात आले.या वेळी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करणात आले. परिसरातील शिवनगरवाडी राजिप शाळेत आदिवासी समाजातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही अडचण निर्माण होवू नये यासाठी सम्यक सामाजिक संस्था हातभार नेहमीच प्रयत्नशील राहील असे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी बोलताना सांगितले. शिवनगरवाडी व लाडिवली रायगड जिल्हा परिषद शाळांना पंखे भेट मिळाल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी गायकवाड, शिक्षक मंदार वेदक यांनी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष मामा कांबळे, सचिव दिपक इंगले, मोहन कांबळे, संदिप निकाडे, तायडे, कांबळे आदींनी आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper