मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने परीसरातील रायगड जिल्हा परिषद (राजिप) शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप सम्यकचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी परीसरातील शिवनगरवाडी राजिप शाळा, पानशिल राजिप शाळा, तळेगाव राजिप शाळा व तळेगाववाडी राजिप शाळा तसेच तळेगाव व तळेगाववाडी अंगणवाडी आदी ठिकाणातील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्शिल, खोडरबर, पट्टी, शापनर व खाऊचे वाटप करण्यात आले.
या वेळी शालेय मुख्यध्यापक, मुख्याध्यापिका व शिक्षकांनी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले. या कार्यक्रमात सम्यक सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष मामा कांबळे, खजिनदार संदिप निकाडे, सचिव दिपक इंगले, सल्लागार अॅड. डि. टी. दांडगे, फुलचंद लोंढे, राहुल जाधव आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper