मोहोपाडा : प्रतिनिधी
चौक बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पुतळ्यामागील कमान याची झालेली दुरवस्था बघून रसायनी विभाग संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्यांनी या शिवस्मारकाचे सुशोभीकरण केले. त्यांनी आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करून रंगरंगोटी केली.
एक हात समाजसेवेसाठी या वाक्याचा अभिमान बाळगत रसायनी विभाग संभाजी ब्रिगेड अध्यक्ष केदार शिंदे, अजित पाटील या शिवभक्तांनी पुढाकार घेऊन व अमोल सुर्वे तसेच उपाध्यक्ष नरेश पेलनेकर यांच्या मेहनतीने हे अभिमानास्पद कार्य करण्यात आले.
शिवस्मारकांचे सुशोभीकरण करण्याचे कार्य करण्यासाठी पंकज जाधव, विशाल पाटील, प्रसाद काईनकर, अखिल मुकणे, केतन रोकडे, मनोज पिंगळे, अनिकेत पवार, अनंत रसाळ, महेंद्र भोसले, महेश या तरुणांनी मेहनत घेतली. त्यांनी हे कार्य स्व:खर्चाने केले. या वेळी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ मगर व जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
RamPrahar – The Panvel Daily Paper