Breaking News

रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी बाईक रॅली

अलिबाग ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वाहतूक शाखा तसेच रायगड बाईकर्स फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक अशोक दुधे (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात असून सुरक्षित प्रवासासंबंधी जनजागृती करण्यासाठी रायगड पोलीस महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर यांनी रॅलीप्रसंगी सांगितले. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर इत्यादी जिल्ह्यातून सुमारे 200 बाईकस्वार या महोत्सवात सहभागी होते. नील बीच कॅम्पिंग, नांदगाव (मुरूड) येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. टेंट स्टे पद्धतीने निवास व्यवस्था, विविध बाईक संबधी स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रम, घरगुती पध्दतीचे जेवण, फायर नाईट अशा प्रकारे महोत्सवाचे स्वरूप होते. सहभागी बाईक रायडर्सना प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून रस्ता सुरक्षा विषयावर प्रबोधन करणारे पथनाट्य सादर करण्यात आले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply