Breaking News

रस्त्यावरील ड्रेनेजचे धोकादायक झाकण बदलले

पनवेल : वार्ताहर

गार्डन हॉटेल ते पनवेल महानगरपालिका कार्यालय या स्वामी नित्यानंद मार्गावरील सिजलर कोबे हॉटेल समोरील ड्रेनेजचे झाकण कमकुवत झाले होते. कोणत्याही क्षणी जे तुटण्याची शक्यता होती. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून नगरसेवक विक्रांत पाटील यांनी ते ड्रेनेजचे मोडकळीस आलेले झाकणतातडीने बदलून घेतले.

स्वामी नित्यानंद मार्गावरील कमकुवत झालेल्या ड्रेनेजचे झाकणावर एखादे जड वाहन गेले असते तर झाकण तुटून दुर्घटना दुर्घटना होण्याची शक्यता होती. या विषयाचे गांभीर्य व पुढील धोका लक्षात घेऊन नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महापालिका अधिकारी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधून हे ड्रेनेजचे झाकण बदलण्यास सांगितले. त्यानुसार कॉन्ट्रॅक्टरने नवीन लोखंडी झाकण बसविले. या सतर्कतेबद्दल नागरिकांनी विक्रांत पाटील यांचे आभार मानले आहेत.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply