Breaking News

राजनाल्याचा बांध फुटल्याने शेतीचे नुकसान

कडाव : प्रतिनिधी

मागील चार-पाच दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कर्जत तालुक्यातील राजनाल्याचा बंधारा तांबस गावाजवळ फुटल्याने परिसरातील भात लागवड झालेल्या जमिनीचे  नुकसान झाले. मात्र अद्यापही या ठिकाणी स्थानिक यंत्रणा फिरकली नसल्याने शेतकरी प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत.

26 आणि 27 जुलै रोजी कर्जत तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यात कर्जत तालुक्यातील राजनाल्याचा बांध फुटल्याने तांबस, मार्केवाडी परिसरातील लागवड केलेल्या सुमारे पन्नास हेक्टर भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र या ठिकाणी स्थानिक प्रशासन यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी लक्ष न घातल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अतिवृष्टीमुळे तांबस परिसरातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र तीन-चार दिवस होऊनसुद्धा स्थानिक यंत्रणेचे कर्मचारी याठिकाणी फिरकले नाहीत.                 -सुदर्शन कोळंबे, सामाजिक कार्यकर्ता

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply