उरण : वार्ताहर
उरण येथील राजस्थान वैष्णव मित्र मंडळाच्या वतीने होळी महोत्सव 2020चे युईएस कॉलेज येथे आयोजन
करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी उपस्थित होते. या वेळी विशेष होळीच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे दहावी व बारावीत 72 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
या वेळी अशोक बालदी, नगरसेवक कौशिक शहा, मोटा सिंह, गणेश सेवक (गुर्जर), लक्ष्मण सेवक (गुर्जर), सिंवसिंह खरवड, नरपत सिंह, मोहन सिंह, मांगीलाल गुर्जर, पुरुषोत्तम सेवक (गुर्जर), कन्हैयालाल गुर्जर, रतनलाल गुर्जर, किसन गुर्जर, पृथ्वी महाराज तसेच महिलावर्ग उपस्थित होता. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश सेवक यांनी केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper