खारघर : रामप्रहर वृत्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे नागरिकांना सेवा पुरविणार्या आस्थापनावर अतिरिक्त जबाबदारीचा भर पडला. त्यामुळे खारघर-तळोजा मंडळाचे संयोजक राजेंद्र मांजरेकर यांनी जीवाची व आरोग्याची पर्वा न करता दिवसरात्र नागरिकांची सेवा करणार्या पोलिसांना 21 दिवस चहा बिस्कीट देण्याचा संकल्प केला.
तसेच मांजरेकर यांनी नागरिकांना आवाहन केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने 21 नागरिक पुढे आले. पहिल्याच दिवशी खारघर-तळोजा मंडळाचे संयोजक राजेंद्र मांजरेकर यांच्यातर्फे सर्व पोलिसांना चहा बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. या वेळी सोबत खारघरचे सरचिटणीस दीपक शिंदे, बिपीन भगत, मंगेश गव्हाणे, संदीप कासार आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper