पनवेल : रामप्रहर वृत्त
राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिनदर्शिकेचे कौतुक करून पदाधिकार्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडून अशा प्रकारची कार्य अपेक्षित आहे असे आवर्जून सांगितले.
प्रकाशनाच्या वेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सहचिटणीस केवल महाडिक, सचिन लोखंडे व ओमकार महाडिक आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper