Breaking News

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खोपोलीच्या विनायक पाटीलला ‘सुवर्ण’

खोपोली : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीच्या विनायक मारुती पाटील याने चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदकाची कमाई केली.  महाराष्ट्र कामगार मंडळ व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई प्रभादेवी येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 59 वजनी गटात विनायकने सुवर्णपदक जिंकले.

चमकदार कामगिरीबद्दल विनायक पाटील याची दिल्ली येथे 24 ते 27 नोव्हेंबरदरम्यान होत असणार्‍या राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे. यापूर्वीही विनायकने विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्यपदकांची कमाई केली आहे, तसेच अनेकांना प्रशिक्षण देऊन उत्कृष्ट खेळाडू तयार केले आहेत. अनेक स्पर्धांत पंच म्हणूनही त्यांना आमंत्रित करण्यात येत असते.

विनायक पाटील महिंद्रा सानयो कारखान्यात नोकरी करीत आहेत. सुवर्णपदक पटकाविल्याने व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply