मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण घेण्यासाठी नागपुरात सभागृह नाही तसेच आमदार निवास हे सध्या विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेता येणार नाही, तर ते मुंबईतच होईल. 15 फेब्रुवारीला सल्लागार समितीची बैठक होणार आहे. तेव्हा यावर चर्चा केली जाईल, असे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक बुधवारी (दि. 9) यांनी सांगितले. नियमानुसार वर्षातून किमान तीन अधिवेशने घेणे बंधनकारक आहे. त्यातील एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. साधारणतः तिसरे म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला होते, पण कोरोनाच्या कारणाने दोन वर्षांत एकही अधिवेशन नागपूरला झाले नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी करण्यात येत होती, मात्र ते यंदाही शक्य नसल्याचे दिसते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper