मुंबई : राज्यभरातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीला सुरू होणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. 3) पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सांगितल्याप्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेच्या 50 टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या घेऊन महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचाच अर्थ 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू होणार आहेत तसेच या वर्षी विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती बंधनकारक नसणार आहे. महाविद्यालये सुरू होत असताना यूजीसीच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयास कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. शिक्षण मंत्रालय व यूजीसी यांचा सल्ला घेऊन भविष्यातील निर्णय कसे घ्यायचे हे ठरवावे, असेदेखील सांगण्यात आले आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper