Breaking News

राज्यातील महिला सुरक्षेप्रश्नी दोन दिवसांचे अधिवेशन घ्या!

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश

मुंबई ः प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत.
या अधिवेशनात राज्यातील महिलांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, असे राज्यपाल कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला सांगितले आहे. या संदर्भात राज्यपालांनी पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply